December 13, 2025 3:43 PM | CM Devendra Fadnavis

printer

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं सीआयआय अन्न प्रक्रिया परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. या परिषदेमधे विविध विषयांवर चर्चा होईल, तसंच प्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी धोरणं आखली जातील, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. वातावरण बदलामुळे शेतीवर झालेला परिणाम हे आपल्यासमोरील  मोठं  आव्हान आहे, ज्या क्षेत्रात मूल्यवर्धन आहे तिथे शेतकरी बाजारावर प्रभाव टाकू शकतात, मात्र जिथे मूल्यवर्धन नाही तिथे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे उत्पादनांचं मूल्यवर्धन करून प्रक्रिया उद्योग परिसंस्था बळकट करण्याची  गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.