राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं 29 महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांच्या एकंदर 893 प्रभागांमधून 2 हजार 869 जागांसाठी 33 हजार 606 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या म्हणजे 2 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान धुळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकी दोन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
Site Admin | January 1, 2026 1:51 PM | ElectionMuncipales2026
राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल