लातूरमध्ये ४ नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ४४ तर सदस्य पदासाठी ६१४ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे. लातुरमध्ये काल नगराध्यक्ष पदासाठीच्या एकूण १५ तर सदस्य पदासाठीच्या १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
रत्नागिरी जिल्ह्यातही नगराध्यक्षपदांच्या सात, तर नगरसेवकपदांच्या ८४ अशा एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
धाराशिव मध्ये आता नगराध्यक्ष पदासाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. नगराध्यक्ष पदासाठीच्या ३३ जणांनी अर्ज मागे घेतले. जिल्ह्यातल्या आठ नगरपालिकांसाठी आता ६४३ उमेदवार रिंगणात असून काल २५२ अर्ज मागे घेतले गेले.
रायगड मध्येही आता १० नगरपालिकांमध्ये ५६८ उमेदवार नगरसेवकपदासाठी निवडणूक लढतील. काल १४६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. जिल्ह्यात ८ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर ३४ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
लढतींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता, सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे.