राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या १५०व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमातून आदरांजली

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशेपन्नासाव्या जयंती दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन इथं  छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनीही  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना समाजमाध्यमांवर आदरांजली वाहिली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या  ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ इथल्या राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल. ऐतिहासिक दसरा चौक येथे १९२७ साली बांधलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं  पूजन करुन पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त कोल्हापूर मध्ये शोभा यात्रा आणि  समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.