August 14, 2025 12:56 PM | ECI

printer

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी शब्दावर निवडणूक आयोगाचा आक्षेप

राजकीय व्यक्तींकडून वापरण्यात येणाऱ्या वोट चोरी या शब्दावर केंद्रीय निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारचे शब्द भारतीय मतदारांच्या प्रतिष्ठेवर आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक पणावर आघात केल्यासारखं असल्याचं त्यांंनी म्हटलं आहे. एक व्यक्ती एक मत हे तत्त्व पहिल्या  निवडणुकीपासून लागू असून बोगस मतदानाच्या तक्रारी पुराव्यानिशी सादर केल्या पाहिजेत. ज्यांच्याकडे एका व्यक्तीने दोनदा मतदान केल्याचा पुरावा असल्यास तो आयोगाकडे सादर करावा. असंही त्यांनी म्हटलं आहे.