रशिया आणि युक्रेन यांनी १४६ युध्दकैद्यांची काल देवाणघेवाण केली. संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्तींनंतर त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती रशियाच्या संरक्षण दलानं दिली. सुटका झालेल्या रशियन नागरिकांना बेलारुसमध्ये वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त अरब अमिरीतीचे आभार मानले आहेत. २०२२ मध्ये रशियाने केलेल्या कारवाईदरम्यान या नागरिकांना पकडण्यात आलं होतं. २३ जुलै रोजी इस्तांबूल इथं रशिया आणि युक्रेनदरम्यान शांततेसाठीची तिसरी फेरी झाली होती. त्यावेळी बाराशे नागरिकांची सुटका करण्यासंदर्भात दोन्ही देशांमधे सहमती झाली होती.