रशियात सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर

रशियाच्या उत्तर कॉकेशस प्रांतातल्या डर्बेंट आणि माखाचकाला या शहरांमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी काल केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७वर पोहोचली आहे. यात १५ पोलीस अधिकारी,१ धर्मगुरू आणि एका सुरक्षारक्षकाचा समावेश आहे. सहा हल्लेखोर ठार झाले असून इतरांचा शोध सुरू आहे.