डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 26, 2024 10:33 AM

printer

रशियाचे माजी संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना अटक वॉरंट जारी

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने रशियाचे माजी संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु आणि चीफ ऑफ जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना अटक वॉरंट जारी केलं आहे. या दोघांवर युक्रेनमधल्या युद्धादरम्यान युद्ध अपराध आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा संशय असल्याचं आयसीसीच्या न्यायाधीशांनी म्हटलं आहे. ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान नागरी लक्ष्यांवर झालेल्या हल्ल्यांसाठी हे दोघं जबाबदार असण्याला तार्किक आधार असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.