युरो कप चॅम्पियनशीप १५ जून रोजी होणार सुरू

युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशीप अर्थात युरो कप १५ जून रोजी सुरू होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जर्मनी आणि स्कॉटलँड यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत २४ संघ सहभागी होणार आहेत. या संघांना सहा गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. यजमान संघ जर्मनी अ गटात तर गतविजेता इटली ब गटात आहे.