September 19, 2025 7:32 PM

printer

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर

नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रसिद्ध हिंदी कवी कुमार अंबुज यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. दरवर्षी एका निवडक अ-मराठी कवीला हा पुरस्कार दिला जातो. येत्या बुधवारी नाशिकमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. कवी कुमार अंबुज यांचे आतापर्यंत ५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना यापूर्वी मध्यप्रदेश साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.