August 25, 2025 3:45 PM

printer

“मेरी पंचायत” मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा पुरस्कार देऊन गौरव

भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयानं विकसित केलेल्या “मेरी पंचायत” मोबाईल अ‍ॅप्लिकेशनला, जिनिव्हा इथं झालेल्या जागतिक शिखर परिषदेत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. दोन लाख ६५ हजार  ग्रामपंचायती आणि ९५ कोटी ग्रामीण नागरिकांना या ॲपचा फायदा होतो.

 

२५ लाखांहून अधिक प्रतिनिधींसाठी हे एक सक्षम व्यासपीठ असून, या ॲपवर ग्रामपंचायत स्तरावर बजेट, योजना, पायाभूत सुविधा, सेवांची माहिती आणि हवामान अंदाज आदींबाबत माहिती मिळते. १२ हून अधिक प्रादेशिक भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे.