शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. हे उमेदवार www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक, तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकांमागे एक, अशा प्रकारे राज्यभरात एकंदर ५० हजार योजनादूतांची निवड सहा महिन्यांसाठी केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन मिळेल. १८ ते ३५ वर्षं वयोगटातले, महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र असलेले कोणत्याही शाखेचे पदवीधर यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर आहे.
Site Admin | September 8, 2024 5:58 PM
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्यासाठी अधिक माहिती जाणून घ्या
