डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबई शेअर बाजारात चढउतार

शेअर बाजारात आज चढउतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी शुक्रवारच्या तुलनेत १६७ अंकांनी वर उघडला. दुपारपर्यंत बाजार चढे होते. त्यादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकदा ८० हजार ८६३ अंकांची नवी उंची गाठली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४ हजार ६३५ उंचीवर पोचला होता. मात्र ही उंची शेवटपर्यंत टिकली नाही. 

दिवसअखेर सेन्सेक्स १४६ अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ६६५ अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८५ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ५८७ अंकांवर बंद झाला.