मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट

मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट दिसून येत आहे. वातावरणातला उष्मा कमी झाल्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्यापर्यंत थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, यानम, रायलसीमा आणि अंदमान निकोबार बेटांवर पुढले दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरातल्या हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं राजधानी आणि आसपासच्या प्रदेशात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा लागू केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.