डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 12, 2025 3:37 PM | IOAA 2025

printer

मुंबईत १८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन

१८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे. केंद्रसरकारचे  मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

 

या स्पर्धेत  ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी  सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेची आयोजक संस्था असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली.

 

१० दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा उद्देश खगोलशास्त्रात गती असणाऱ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणणं हे आहे, असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचे अध्यक्ष प्राध्यापक अनिकेत सुळे यांनी केलं. भारताकडून पाच विद्यार्थ्यांचा चमू या स्पर्धेत सहभागी होणार असून त्याचं नेतृत्व हरविंदर कौर जस्सल आणि जसजीत सिंह बागला हे दोघे करणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.