January 24, 2026 3:54 PM

printer

मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर २ कोटी ८९ लाख रूपये किमतीचं सोनं जप्त

महसूल गुप्तचर संचलनालयानं आज मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर सौदी अरेबियातून अवैधरित्या आणलेलं सुमारे २ कोटी ८९ लाख रूपये किमतीचं सोनं जप्त केलं. दीड किलोहून अधिक वजनाचं हे सोनं एका यंत्रात लपवलेलं होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. हे पार्सल स्वीकारण्यासाठी आलेल्या २ जणांना अटकही करण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.