मुंबईच्या पवई भागात १७ लहान मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य याला काल दोन तासांच्या वाटाघाटींनंतर पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला. अभिनय चाचणीच्या नावाखाली त्यानं या मुलांना पवईतल्या एका स्टुडिओत बोलावून ओलीस ठेवलं होतं.
त्याच्याशी चर्चा अयशस्वी ठरल्यानंतर पोलिसांनी स्वच्छतागृहातून स्टुडिओत प्रवेश केला. रोहित आर्य यानं पोलीस अधिकाऱ्यांवर एअर गन चालवल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळ्या झाडल्या, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या स्टुडिओतून एक पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशील रबरी पदार्थ आणि एक लायटर जप्त केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, त्याच्या संस्थेला स्वच्छता मॉनिटर या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून २ कोटी रुपये देणं असल्याचा दावा त्यानं केला होता, मात्र, असं कोणतंही देणं नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं निवेदनाद्वारे दिलं आहे.