माय भारत पोर्टलवर दोन कोटींहून अधिक तरुणांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मांडवीय म्हणाले की, भारतातल्या तरुणांना राष्ट्र उभारणीत सक्षम करण्यासाठी आणि सहभागी करून घेण्यासाठी निर्माण केलेलं माय भारत हे एकछत्री व्यासपीठ आहे.
एनसीसी, एनएसएस आणि स्काउट गाईड या व्यासपीठाखाली काम करत आहेत. राष्ट्रीय युवा कॉर्प्स योजनेअंतर्गत १३ हजार २०० पेक्षा जास्त तरुणांची भरती केली जात असल्याची माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी दिली.