मादागास्कर मध्ये सुरु असलेल्या देशव्यापी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून निघून गेले आहेत. राजोएलिना काल स्थानिक दूरचित्रवाहिनीवर भाषण देणार होते, मात्र निदर्शनकर्त्यांच्या एका गटानं माध्यमांवर ताबा मिळवण्याची धमकी दिल्यावर ते रद्द करण्यात आलं.
राजधानी अँतानानारिव्होमध्ये शेकडो निदर्शक, सैनिक आणि सुरक्षा दलांनी एकत्र येऊन सरकार विरोधात निदर्शनं केली. मादागास्करमध्ये पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाईनं गेल्या महिन्याच्या अखेरीला छेडलेल्या या आंदोलनं हिंसक स्वरूप घेतलं आहे.