डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 18, 2025 2:27 PM | shantanu jha

printer

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अ‍ॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर अ‍ॅडमिरल शंतनू झा यांनी स्वीकारला आहे. आयएनएस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर अ‍ॅडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले शंतनू झा यांची १ जुलै १९९३ रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली. आय एन एस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर त्यांनी कार्यकारी अधिकारी पद सांभाळले असून नौकानयनशास्त्र आणि दिशादर्शन यात झा तज्ञ आहेत. नौसेना पदक हा महत्वपूर्ण सन्मान शंतनू झा यांना प्राप्त झाला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.