भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि इशान्ये कडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तर उद्या विदर्भ, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, नागालँड, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार पावासाचा इशाला दिला आहे. राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थानातून परतला आहे तर येत्या दोन तीन दिवसांत पंजाबचा काही भाग आणि गुजरातमधून तो परत फिरेल, असाही अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.