September 28, 2024 2:25 PM | Weather Update

printer

महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगालचं उप हिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रासह गुजरात, पश्चिम बंगालचं उप हिमालयीन क्षेत्र, सिक्कीम आणि बिहारच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंडात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात उद्याही पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात पुढील २-३ दिवसांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.