डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यां; पुतळा पडल्या प्रकरणी एका आरोपीला अटक

सिंधुदुर्गात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चेतन पाटील या एका आरोपीला अटक केली आहे. चेतन याला कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचं सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं. चेतन पाटील हा पुतळा बनवण्याचं कंत्राट दिल्या गेलेल्या मेसर्स आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून काम पाहात होता. या कंपनीचा मालक आणि पडलेल्या मुर्तीचा शिल्पकार जयदीप आपटे हा या प्रकरणातला दुसरा आरोपी असून, तो अद्यापही फरार आहे.