महाराष्ट्राच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागपूर इथं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेलाही मंत्रिमंडळानं मजुरी दिली. यामुळे आता शेत रस्ते तयार करण्यासाठी १०० टक्के यंत्रसामुग्रीचा वापर करता येणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना पेरणी, कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्यासाठी बारमाही मजबूत रस्ते उपलब्ध होणार आहेत.