‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अंबड गावातील राजू कानवडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भुमिका महत्वाची असल्यानं या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावं हा या पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. उद्या 25 जूनला पुण्यात या पुरस्कारांचा वितरण सोहोळा होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीशी बोलताना राजू कानवडे म्हणाले.