निवडणूक प्रक्रीयेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसनं आज नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेळावा घेतला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भाषणं मेळाव्यात झाली. मतचोरी रोखणं सर्वांचीच जबाबदारी असल्याचं खरगे म्हणाले. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मेळाव्याला उपस्थित होते.
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत काँग्रेस संभ्रम निर्माण करत असल्याची टीका भाजपा प्रवक्ते संभित पात्रा यांनी केली आहे.
Site Admin | December 14, 2025 8:01 PM | mallikarjun kharge
मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसचा नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेळावा