डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मणिपूरमधील बोरोबेकरा भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात

मणिपूरमधील जिरीबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा उपविभागाअंतर्गतच्या भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात केले गेले आहेत. ६ मे पासून इथे पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचाराचा या क्षेत्रात मोठा प्रभाव दिसून आल्यानं अतिरिक्त जवान तैनात केल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
जिल्हा प्रशासनानं आज मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरसह इतर आवश्यक वस्तूंचं वाटप केलं. यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारेही अविरत सेवा पुरवली जात आहे. जिल्हा मुख्यालयात आश्रय घेतलेल्या मुलांसाठी पहिली ते आठवीपर्यंतचे वर्गही सुरू केले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.