नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं उद्यापासून रविवारपर्यंत वर्ल्ड फूड इंडिया २०२५ हे व्यापार प्रदर्शन आयोजित केलं असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महोत्सवाचं उदघाटन करतील. यंदा या प्रदर्शनाचं चौथं वर्ष आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देणं, आणि भारताच्या समृद्ध अन्न संस्कृतीची जगाला ओळख करून देणं, हे याचं उद्दिष्ट आहे.
या व्यापार प्रदर्शनात १७०० पेक्षा जास्त प्रदर्शक, ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय खरेदीदार, आणि १०० पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. २१ पेक्षा जास्त देश, भारतातली २१ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश, तसंच आणि १० केंद्रीय मंत्रालयांचा यात सहभाग असेल.