भारत, अणुउर्जा कार्यक्रमाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, त्यासाठी सर्वोच्च सुरक्षा निकष कायम ठेवत ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने सुधारणा केल्या जात असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल स्पष्ट केलं. दिल्लीत माध्यम प्रतिनिधींच्या गोलमेज परिषदेत संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. सरकारने अलीकडेच अणुउर्जा कायद्यांतर्गत तपशीलवार नियम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आवश्यक सुरक्षा उपायांविषयी तडजोड न करता, सरकार अणु ऊर्जा क्षेत्र खाजगी आस्थापनांसह बिगर सरकारी सहभागासाठी खुले करत असल्याचेही सिंह यांनी सांगितले.
Site Admin | January 22, 2026 11:50 AM | Dr. Jitendra Singh
भारत त्याच्या अणुऊर्जा कार्यक्रमात एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह