डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 31, 2025 2:29 PM

printer

भारत आणि अमेरिका दरम्यान संरक्षण क्षेत्रातला पुढच्या १० वर्षांसाठी आराखडा करार

भारत आणि अमेरिका यांनी संरक्षण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत पुढच्या १० वर्षांसाठी एक आराखडा करार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्या बैठकीत यावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती सिंह यांनी समाजमाध्यमावर दिली. दोन्ही देशांमधल्या बळकट संरक्षण भागीदारीचं नवं युग यामुळे सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.