भारतीय हॉकी संघानं सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत बेल्जियमशी होणार आहे.
दरम्यान ,चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेत भारताने काल ओमानवर १७-० असा दणदणीत विजय मिळवला. भारताने दोन सामन्यांत एकंदर २४ गोल करून गट ब मध्ये आघाडी घेतली असून भारताचा पुढील सामना स्वित्झर्लंडविरुद्ध होणार आहे.