January 18, 2026 2:40 PM | Weather

printer

भारतीय हवामान विभागाची पुढील दोन दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता

भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवस दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब आणि बिहारमधील काही ठिकाणी दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही आज अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे, तर मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात किमान तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.