भारतीय रिझर्व्ह बँकेला ग्लोबल फायनान्सचा नवोन्मेषी आर्थिक संस्था पुरस्कार जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड ग्लोबल फायनान्स या अर्थविषयक मासिकाने जागतिक पातळीवर सर्वात नवोन्मेषी आर्थिक संस्था म्हणून केली आहे. आर्थिक क्षेत्रात सातत्यानं नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. कर्जाची प्रक्रिया सुलभ करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या ‘युनिफाईड लेंडिंग इंटरफेस’मुळे हा पुरस्कार मिळाल्याची, तसंच हा पुरस्कार मिळवणारी आरबीआय ही पहिलीच मध्यवर्ती बँक असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली आहे.