November 18, 2025 2:57 PM

printer

भारतीय प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक

भारताचं प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सर्वात वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरलं असून २०३० पर्यंत शंभर अब्ज अमेरिकी डॉलरचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.

 

गेल्या दशकभरात या क्षेत्राचं अर्थव्यवस्थेतलं योगदान सातत्यानं वाढत असून मूल्यवर्धन आणि रोजगारनिर्मिती या दोन्हीत या क्षेत्राचा मोठा हातभार लागत आहे.

 

ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेट रिॲलिटी या क्षेत्रांमुळे देशाच्या सर्जनशील क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.