भारतीय जनता पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा कार्यालयात आज झालेल्या वार्ताहर परिषदेत मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडनवीस यांनी ही घोषणा केली.
मावळते अध्यक्ष आशीष शेलार यांच्या कारकीर्दीत भाजपाने अनेक महत्त्वपूर्ण निवडणुका जिंकल्या आणि मुंबईत पक्षाचं अस्तित्व निर्माण केलं असं फडनवीस म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुंबईला नवा अध्यक्ष असा निर्णय झाला. त्यानुसार अमित साटम यांची निवड प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्याचं त्यांनी सांगितलं.