December 4, 2025 2:30 PM

printer

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ७.४ टक्के राहण्याचा अंदाज

अर्थव्यवस्थेसंदर्भातली जागतिक स्तरावरची मानांकन संस्था फिचनं चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून तो पूर्वीच्या ६ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. अलीकडेच केलेल्या कर सुधारणेमुळे ही वाढ होईल असंही फिचनं म्हटलं आहे. खाजगी ग्राहकांकडून करण्यात येणारा खर्च आणि वस्तू आणि सेवाकरातल्या सुधारणांमुळे हे शक्य होणार आहे. पुढच्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के होणार असून डॉलरच्या तुलनेत रुपयाही प्रतिडॉलर ८७ रुपयांचा आसपास राहण्याचा अंदाजही फिचनं वर्तवला आहे.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.