भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी यानं दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम अंतिम फेरीच्या राउंड-रॉबिनच्या पाचव्या फेरीत अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन याचा पराभव केला.
सात फेऱ्यांच्या अखेरील अर्जुन यानं साडेचार गुणांसह तिसऱ्या स्थान पटकावलं. आता नॉकआउट फेरीत त्याचा सामना जर्मनीच्या विन्सेंट कीमर याच्याशी होईल, तर कार्लसनसमोर फॅबियानो कारुआना याचं आव्हान असेल.