January 1, 2026 7:41 PM

printer

भाजपमधल्या नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील- चंद्रशेखर बावनकुळे

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमधल्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतले जातील, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपूर इथे ते माध्यमांशी बोलत होते. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्ते पक्षासाठीच काम करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

पुण्यात गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना संधी दिल्याच्या प्रश्नावर, केवळ गुन्हा दाखल असणं आणि न्यायालयात दोष सिद्ध होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या उमेदवारांबद्दल न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच भाष्य करता येईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.