डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 27, 2024 9:45 AM

printer

ब्रिटनच्या दुतावासातील अधिकाऱ्याची रशियाकडून हकालपट्टी

रशियानं, कथित हेरगिरीच्या आरोपानंतर ब्रिटनच्या दुतावासातील अधिकाऱ्याची हकालपट्टी केली आहे. हेरगिरी करण्याच्या उद्देशाने देशात प्रवेश कऱण्याच्या हेतूने जाणूनबुजून चुकीची माहिती दिली ज्यामुळे रशियाच्या कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. रशियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार, या अधिकाऱ्यांची राजनयिक मान्यता रद्द करण्यात आली असून, दोन आठवड्यात त्याला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.