September 16, 2025 7:53 PM

printer

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश

बोगस जात प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचे निर्देश ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. 

 

ओबीसी समाजाच्या विविध योजनांसाठी थकीत असलेला २ हजार ९३३ कोटी रुपयांचा निधी १५ दिवसांच्या आत देण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमधील त्रुटी दूर करून थकीत रक्कम लवकरच दिली जाईल, असं आश्वासन बावनकुळे यांनी बैठकीत दिलं. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये वसतिगृहे उभारण्याच्या काम लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी १६ जिल्ह्यांमध्ये जागेची आवश्यकता असून, भूसंपादनासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.