डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 12, 2025 2:36 PM | FIDE Chess Olympiad

printer

बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर निहाल सरीन चा विजय

फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मगसूदलू वर विजय मिळवत साडेपाच गुणांची कमाई केली आहे. भारताच्या अर्जुन एरगेसीला हरवणाऱ्या जीएम मॅथियास ब्लूबॉम शी त्याने बरोबरी केली आहे. दरम्यान विश्वविजेता डी गुकेश ने तुर्कियेचा एडिझ गुरेल याच्याबरोबरचा सामना  गमावला. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता त्याला उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील.

महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश मिळाला असून गुकेशचा पुढचा सामना तिच्याबरोबर होणार आहे.