डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान १ लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधीची उभारणी – मंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. 

 

मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन रुग्णालयात नव्यानं इमारती बांधून त्यात वाढीव रुग्ण खाटा, परिचारिका निवास, बाह्य रुग्ण विभाग यासह अनेक सुविधा दिल्या जातील अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ६१६ कोटी रूपये खर्चून डिसेंबर २०२५ पर्यंत पहिली इमारत, तर दुसऱ्या टप्प्यात १५०७ कोटी रूपये खर्चून दुसरी इमारत उभारली जाणार आहे, असं सामंत म्हणाले.