डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बी. आय. टी. चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक – उदय सामंत

मुंबईच्या परळ भागातल्या बी. आय. टी. चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दीर्घकाळ वास्तव्य असल्यानं तिथे त्यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र विधानपरिषदेत दिली. या चाळीत अद्याप काही लोक राहत असून त्यांचं पुनर्वसन झाल्यावर स्मारकाचं काम पुढे नेण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं. इंदू मिल परिसरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारण्याचं काम वेगानं सुरू आहे. त्यांचा भव्य पुतळा उभारण्यास लागणारा वेळ सोडता उर्वरित काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिलं.पुण्याच्या कल्याणीनगर भागात मे महिन्यात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाच्या तपासात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिशय तत्परतेनं काम केलं आहे, यात कुठेही निष्काळजीपणा झालेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आत्तापर्यंत १ लाख ७३ हजार २७२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ११ हजार ७८८ ग्राहकांनी ४९ पूर्णांक२२ शतांश मेगावॅट क्षमतेची सोलर रूफटॉप यंत्रणा इन्व्हर्टरसहित बसवण्यात आलेली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.