बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतल्या पुरुष एकेरीतलं भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान काल संपुष्टात आलं. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चीनी खेळाडू शी यू ने लक्ष्य सेनचा २१-१७,२१-१९, असा पराभव केला.
ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा या पांडा भगिनींही पहिल्याच फेरीत पराभूत झाल्या. बुल्गारियाच्या गॅब्रिएला आणि स्टेफनी यांनी त्यांचा २१-१२, २१-११ असा पराभव केला.