बिहारमध्ये बेगुसराय जिल्ह्यात पोलिसांच्या विशेष कृती दला बरोबर काल झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला. ‘दयानंद मालाकर, उर्फ छोटू’ अशी त्याचं नाव असून, त्याच्यावर ५० हजार रुपयांचं बक्षीस होतं. १४ पेक्षा जास्त गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, तसंच उत्तर बिहारमध्ये अनेक नक्षली कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या कारवाईत ५.५६ एमएम इन्सास रायफल, एक देशी बनावटीचं पिस्टल, २५ जिवंत काडतुसं आणि १५ वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.