डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिगर-नाटो सहयोगी म्हणून अमेरिकेने केनियाची नियुक्ती केली

अमेरिकेने आपला एमएनएनए, म्हणजेच प्रमुख बिगर-नाटो सहयोगी म्हणून केनियाची नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार एमएनएनए हा दर्जा, परदेशी भागीदार देशांना संरक्षण, व्यापार आणि सुरक्षा विषयक सहकार्याच्या क्षेत्रात काही लाभ मिळवून देतो.

 

केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांच्या गेल्या महिन्यातल्या अमेरिका भेटी दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केनियाला आपला प्रमुख बिगर -नाटो सहयोगी म्हणून नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं.