डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 7, 2024 9:47 AM | banglade

printer

बांग्लादेशमधला भारतीय दूतावास तिथल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात

बांग्लादेशमधलं भारतीय दूतावासाचं कार्यालय तिथल्या भारतीय नागरिकांच्या सतत संपर्कात असल्याचं काल सरकारनं संसदेत सांगितलं. तिथल्या अल्पसंख्याकांच्या बाबतीतल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर बांग्लादेशमधल्या स्थितीवर चर्चा करताना म्हणाले. या घडीला 19 हजार भारतीय नागरिक बांग्लादेशात आहेत. यात 9 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारतीय उच्चायुक्तालयाच्या सूचनेनंतर बरेच विद्यार्थी गेल्या महिन्यात भारतात परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.