फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून फ्रान्सची औपचारिक मान्यता असल्याचं आज घोषित केलं. इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकंदरम्यानच्या शांततेला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मॅक्रॉन यांनी आज न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक बैठकीच्या उदघाटनपर सत्रात ही माहिती दिली.
ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा आणि पोर्तुगाल यांनी काल स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्याला औपचारिक मान्यता दिली होती.
दरम्यान, पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणं म्हणजे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखं आहे, अशी टीका इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी केली आहे.