प्रादा या जागतिक फॅशन ब्रँडनं कोल्हापुरी चपलेशी साधर्म्य असलेल्या आरेखनाचा अनधिकृतपणे वापर केल्याबद्दल या ब्रँडवर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पीठाने हा निर्णय दिला.
२२ जून रोजी मिलान इथं झालेल्या त्यांच्या फॅशन शोमध्ये प्रादाने सादर केलेल्या सँडलमध्ये आणि पारंपारिक कोल्हापुरी चपलेमध्ये साम्य असल्याचे आरोप करण्यात आले होते. प्रादानं कोल्हापुरी चपलेशी संबंधित असलेल्या कारागीर समुदायांच्या हक्कांचं उल्लंघन केलं असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.