प्रधानमंत्री येत्या २९ सप्टेंबरला मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी साधणार संवाद 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरुन मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद  साधणार  आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल. 

या कार्यक्रमासाठी  आपल्या  कल्पना आणि सूचना  १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर २७ सप्टेंबरपर्यंत  देता येतील. तसंच माय  जीओव्ही  संकेतस्थळावरून देखील सूचना  पाठवता  येतील. 

हा कार्यक्रम २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन  प्रसारित  करण्यात  येईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.